मराठी जनतेने ज्या आत्मकथेचे - संघर्षगाथेचे स्वागत अभिमानाने केले त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाची नवीन संक्षिप्त आवृत्ती आता वाचकांसाठी उपलब्ध करून देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे .
ही फक्त एका राजकीय सामाजिक नेतृत्वाची कथा नाही तर ही आहे भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील नव्या पिढीची आशावादाची ,राजकीय घडामोडींची, संघर्षांची, निर्णयांची आणि मूल्यांची कहाणी आहे. या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळेल,
गेल्या सहा दशकांच्या पवार साहेबांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे, सत्ता, संघर्ष आणि धैर्याची समयसूचकतेची गाथा.. भयंकर आजारावर देखील मात करून उभ्या राहणाऱ्या एका लढवय्या व्यक्तीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कथा, समाजकारणातील दिशादर्शक निर्णय आणि त्यामागची भूमिका, नेतृत्व, संघटनकला आणि माणसं जोडण्याची , आपत्ती व्यवस्थापनात आघाडी घेणार्या साहेबांची स्वतःची अशी उदाहरणे, देश, राज्य आणि सामान्य माणसासाठी ,कलाकार ,खेळाडू यासर्वांसाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमागील दृष्टिकोन.
हे पुस्तक फक्त चरित्र नाही तर आहे.
राजकीय शाळा विचारांची दिशा नेतृत्वाची प्रेरणा आत्मविश्वासाचे धडे
ज्यांना भारतातील राजकारणाची खरी नाडी जाणून घ्यायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे एक लोकप्रिय पुस्तक..
यातून उलगडतो एक नेता, एक रणनीतीकार, एक विचारवंत आणि एक सच्चा माणूस.
आपले पुस्तक आजच मागवा... पुस्तकविश्व, डहाणूकर कॉलनी, कोथरूड, पुणे